राज्यभर आज ‘एकल महिला दिवस’

राज्यभर आज 
‘एकल महिला दिवस’
Published on

पुणे, ता. २२ : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त सोमवारी (ता. २३) राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात महिला व बालविकास आयुक्तालयाने सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला व बालविकास विभागाच्या निर्देशांनुसार, कार्यक्रमांमध्ये ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही संज्ञा वापरण्यात येणार असून, गाव व शहरांतील एकल महिलांना निमंत्रित करून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच, यशस्वी महिलांचा सत्कार, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार संधींची माहिती, बचत गटांशी जोडणी, समुपदेशन आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, गाव व शहरांतील एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करून त्यांच्या प्रमुख समस्या व मागण्यांची नोंद घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com