Sinhagad Fort: सिंहगड झाला अतिक्रमण मुक्त;गड संवर्धनात सकारात्मक निर्णायक पाऊल!
Heritage Conservation : सिंहगड किल्ल्यावर वर्षभर अतिक्रमण करणार्या अनधिकृत बांधकामांची मोठ्या प्रमाणावर काढणी करण्यात आली. अतिक्रमण हटवण्याचा सात दिवसांचा यशस्वी मोहिमेचा समारोप करण्यात आला असून किल्ल्याच्या जतनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
खडकवासला : सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवाला बाधा ठरणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनाने निर्धाराने कारवाई करत सात दिवस सुरू असलेल्या व्यापक मोहिमेचा यशस्वी शेवट आज बुधवारी सायंकाळी झाला.