Sinhagad Fort : सिंहगडावर होतोय, कचऱ्याचा कडेलोट

सिंहगडावर रोज जमा होत असलेला प्लास्टिकचा व सर्व प्रकारचा कचऱ्याचा तटबंदीवरून कडेलोट केला जात आहे.
Sinhagad Fort
Sinhagad Fortsakal

खडकवासला - सिंहगडावर रोज जमा होत असलेला प्लास्टिकचा व सर्व प्रकारचा कचऱ्याचा तटबंदीवरून कडेलोट केला जात आहे. तटबंदी खालील कचरा डेपो पाहून आमदार भीमराव तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली. तरी देखील वनविभाग बघ्याची भूमिका घेत आहे. कोणतीही कार्यवाही करीत नाही. वनविभागाला चांगलेच फैलावर घेतले. तटाखाली पडलेला कचरा काढून घ्यावा. कचऱ्याबाबत विक्रेते ऐकत नसतील तर सर्व स्टॉल बंद करा. अशा सूचना वनविभागाला केल्या आहेत.

सिंहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्य व पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची भूमी आहे. छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. गडाचे संवर्धन, पर्यावरण जपले पाहिजे. अशी भूमिका घेणे गरजेचे असताना वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिंहगडावर प्लास्टिक बंदी असताना देखील गडावर प्लास्टिक येत आहे.

रोज जमा झालेला सर्व प्रकारचा कचरा विक्रेते गडाच्या तटबंदी वरून टाकून देत आहेत. अनेक शिवप्रेमी संस्था, संघटना, व्यायामासाठी येणाऱ्यानी आमदार भीमराव तापकीर याबाबत तक्रारी केल्या होत्या. गडावर दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सिंहगडाच्या विकास आराखड्याबाबत करावयाच्या कामाच्या संदर्भात अधिकारी आणि सल्लागार यांच्या समवेत आमदारांनी पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीचे सचिव किरण इंदलकर, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सपकाळ, पुरातत्व विभागाच्या सल्लागार अर्चना देशमुख, पर्यटन विभागाचे सल्लागार संजय वाघ, सिंहगडचे अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते,‌ पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय जोरकर उपस्थित होते.

पुरातत्व विभागाकडून सिंहगडाच्या कल्याण दरवाजाचे संवर्धनाचे काम सुरु केले होते. काम सध्या का बंद का आहे. याबाबत पुरातत्व विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली का, स्थानिक आमदारांना माहिती दिली का, याची त्यांनी चौकशी केली.

गडावर टॉवरची गर्दी

दूरदर्शन, आकाशवाणी, भारत संचार निगम लिमिटेड, पोलिस वायरलेस विभाग, राज्य परिवहन महामंडळ यासह अनेक टॉवर आहेत. गडावर अनेक प्रकारचे टॉवर आहेत. बंद अवस्थेत असलेले काढून टाकावेत. अनेक प्रकारचे उपग्रह असल्याने टॉवरची आवश्यकता आहे का,

गड संवर्धनाला जोड

- गडावरील पायऱ्या पादचारी मार्ग, तटबंदी याची तातडीने दुरुस्ती करावी

- प्रसिद्ध देव टाक्याची, वाहनतळाची सुधारणा करणे

- ध्यानधारणा केंद्र, अम्पी थिएटर यांची सुधारणा करणे व उपयोगात आणणे

- कार्यक्रमासाठी उभारलेल्या सभा मंडपावर छत टाकणे

- जुन्या धोकादायक इमारती संदर्भात जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करणार

- हवामानाची माहिती देणारे आणि पर्जन्यमापक यंत्र गडावर असावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com