

Sinhagad Fort lost palace British auction 1876 Shivaji Maharaj Rajwada hidden history
esakal
Pune Historical News : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला ऐतिहासिक सिंहगड आपण अनेकदा पाहतो, त्याचे बुलंद बुरुज आणि नभाला भिडणारी तटबंदी आपल्याला थक्क करते. पण आज आपल्याला दिसणारा सिंहगड हा मूळ सिंहगडाचा केवळ एक छोटासा भाग आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
एकेकाळी या विस्तीर्ण गडावर केवळ लष्करी चौक्या नव्हत्या, तर डोळे दिपवून टाकणाऱ्या अनेक भव्य आणि देखण्या इमारती दिमाखात उभ्या होत्या. काळाच्या अथांग प्रवाहात आज या वास्तू कुठे गायब झाल्या आणि त्यांचा साधा मागमूसही गडावर का उरला नाही हा इतिहासप्रेमींना सतावणारा एक मोठा प्रश्न आहे.