सिंहगड घाटात १२ चाकी ट्रक ‘११ हजार पॉइंट’वर अडकला, अवजड वाहतुकीचा धोका; वाहनांच्या रांगा

Sinhagad Ghat Traffic सिंहगड घाटात ‘११ हजार पॉइंट’ येथील तीव्र वळणावर १२ चाकी अवजड ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रक दरीच्या उंबरठ्यावर पोचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
Sinhagad Ghat Traffic

Sinhagad Ghat Traffic

Esakal

Updated on: 

खडकवासला : सिंहगड घाटातील धोकादायक वळणांवरून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बुधवारी सकाळी ‘११ हजार पॉइंट’ येथील तीव्र वळणावर १२ चाकी अवजड ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रक दरीच्या उंबरठ्यावर पोचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला; मात्र या घटनेमुळे सिंहगड घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...