
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला उड्डाण पूल सध्या पोलिस बंदोबस्तात आहे. नुकतेच उद्घाटन झालेल्या आचार्य आनंदऋषीजी (पुणे विद्यापीठ) चौकातील उड्डाणपुलासोबतच याही उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार होते. मात्र, ऐनवेळी पुलाचे काम बाकी असल्याचे कारण देत ते रद्द करण्यात आले. यानिर्णयाला विरोध करत विविध पक्षांकडून उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्याचा इशारा दिला होता. दक्षता म्हणून प्रशासनाकडून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.