मूलभूत सुविधांसाठी धायरीकरांचा आक्रमक पवित्रा

मूलभूत सुविधांसाठी धायरीकरांचा आक्रमक पवित्रा
Published on

सिंहगड रस्ता, ता. ६ : महापालिकेत समावेश होऊन आठ वर्षे झाली. तरीही धायरी आणि सिंहगड रस्ता परिसरातील मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. स्वच्छ आणि सुंदर धायरी कृती समितीने याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. येत्या १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
धायरी फाटा, लाडली चौक आणि उंबऱ्या गणपती चौकात दररोज वाहतूक कोंडी होते. बेनकर वस्ती, डीएसके रस्ता आणि सिंहगड रस्त्यावरही हीच स्थिती आहे. हातगाड्या आणि दुकानांच्या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे समस्येत भर पडत आहे.
परिसरातील रस्ते वारंवार खोदले जातात. अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबर्स उघडे आहेत. कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठाही अपुरा आणि अशुद्ध आहे. सावित्री गार्डन ते मुख्य सिंहगड रस्ता तातडीने पूर्ण करावा. अतिक्रमणांवर कायमस्वरूपी कारवाई करावी. गर्दीच्या वेळी अवजड वाहने आणि टँकरला बंदी घालावी. संबंधित विभागांची संयुक्त बैठक घ्यावी. प्रत्येक कामासाठी अधिकारी आणि कालमर्यादा निश्चित कराव्यात, अशा मागण्या समितीने केल्या आहेत.
कारवाई न झाल्यास अन्नत्याग आंदोलन केले जाईल, असा इशारा समन्वयक विनीत धारणकर आणि जयश्री देशपांडे यांच्यासह कृती समितीने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com