

High Hopes for Sinhagad Road Residents After a Nine-Year Wait
Sakal
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता परिसरातील प्रभागात वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे तसेच सांडपाण्याच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या मूलभूत समस्यांकडे गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समस्यांतून सुटका होईल, अशी भाबडी पण आशादायी अपेक्षा मतदारांमध्ये दिसून येत आहे.