

Pune Mayor Manjusha Nagpure has directed officials to prepare a comprehensive traffic improvement plan for Sinhagad Road within 15 days and deploy 50 wardens to ease congestion.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडून जात आहे. पोलिस, महापालिका प्रशासक, नगरसेवकांवर नागरिक टीकेची झोड उठवत आहेत. अखेर या समस्येवर आज महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक घेत धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव पासून ते दांडेकर पुलापर्यंतच्या भागाचा वाहतूक आराखडा पुढील १५ दिवसात तयार करा. तसेच सिंहगड रस्ता भागासाठी ५० वॉर्डन दिले जातील असेही त्यांनी बैठकीत सांगितले.