

Sinhgad employees protest over 20 months of unpaid salaries.
पुणे : ‘सिंहगड एज्युकेशन सोसायटी’च्या हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २० महिन्यांहून अधिक काळ वेतन थकीत असल्याच्या निषेधार्थ ‘भारतीय मजदूर संघा’च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. ५) शिक्षकदिनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. वेतन थकीत असल्याने संस्थेतील १३ कर्मचाऱ्यांनी जीवन संपविल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.