

Sinhgad Technical Education Society’s 25 institutions placed under administrator by Maharashtra’s Technical Education Department.
esakal
पुणे, : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २५ संस्थांवर प्रशासक नेमण्यात आला आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची न्यायालयीन प्रकरणे, सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता तंत्रशिक्षण संचालनालयातंर्गत येणाऱ्या या संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी दिली.