सिना–माढा उपसा सिंचनच्या कॅनलवर दोन गटांत मारहाण (माढा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल)
सीना-माढा उपसा सिंचनच्या कॅनॉलवर दोन गटांत मारहाण
उपळाई बुद्रूक, ता. १० ः सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलवर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून काठी, दगड, लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने मारहाण झाल्याची घटना माढा तालुक्यातील चिंचोली (ता. ७) रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी शुभम सोमनाथ लोंढे (रा. चिंचोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित लखन समाधान गलांडे, समाधान विष्णु सुतार, सचिन कल्याण मोरे व तानाजी ऊर्फ मुन्ना भालचंद्र मोरे (सर्व रा. बावी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शुभम लोंढे यांच्यासह अमोल, अलका, प्रदीप, अनिल व वनिता लोंढे हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, याच घटनेबाबत लखन समाधान गलांडे (रा. बावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अमोल धनाजी लोंढे, प्रदीप अंकुश लोंढे, अनिल तानाजी लोंढे व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत लखन गलांडे, सचिन मोरे व समाधान सुतार हे जखमी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

