Shirur : बहिणीची आत्महत्या, पत्नीवर वार, पतीनं घेतलं विष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणीची आत्महत्या, पत्नीवर वार, पतीनं घेतलं विष; शिरुर मधली घटना

बहिणीची आत्महत्या, पत्नीवर वार, पतीनं घेतलं विष

- दत्तात्रय कदम

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आज गुरुवारी (दि. १८) घडली.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. १७) समीर भिवाजी तावरे (वय ३५) यांची बहिण माया सोपान सातव (वय ३२) या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा कुटुंबीय शोध घेत होते.

दरम्यान, गुरुवारी सकाळी माया यांचा मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर हा धक्का बसलेल्या समीर याने , घरी येऊन पत्नी वैशाली तावरे (वय २८) हिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात समीरची पत्नी वैशाली जागीच ठार झाली. त्यानंतर समीर याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. समीर याला तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा तसेच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

loading image
go to top