सासवडमधील फळबाजार पुन्हा गजबजला

सासवडमधील फळबाजार पुन्हा गजबजला
Published on

गराडे, ता. ६ : अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले पुरंदर तालुक्यातील सीताफळ पल्प उद्योग कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर पुन्हा सुरू झाले आहेत. कोसळलेले बाजारभाव सावरले आहेत.

सध्या सासवडमधील फळबाजारात दर्जेदार सीताफळाला १५०० ते २००० तर मध्यम दर्जाच्या फळांना ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे. फळबाजार पुन्हा गजबजल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सीताफळ पल्प उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत कृषी संचालक सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील पल्प उद्योग बंद झाल्याने सीताफळाच्या दरात मोठी घसरण झाली होती. या पार्श्वभूमीवर बोरकर व तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांची बैठक घेतली. या समन्वयातून उद्योग पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, यावेळी फळ प्रक्रिया उद्योजकांतर्फे शेतकऱ्यांना मोफत ‘कामगंध सापळ्यांचे’ (फ्लाय ट्रॅप) वाटप करण्यात आले. दर्जेदार व कीडमुक्त उत्पादनासाठी या सापळ्यांचा वापर करण्याचे आवाहन सुनील बोरकर यांनी केले. यावेळी त्यांनी सापळ्यांच्या वापराचे प्रात्यक्षिकही दाखवले. या उपक्रमामुळे खरेदीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी नितीन इंगळे, नाना पाटील, सुशील झेंडे, राजू पोरे, बापू शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पल्प उद्योग पुन्हा सुरू झाल्याने तालुक्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

13560

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com