esakal | राजमाता उद्यानाची साईटभिंत बनला मद्यपींचा अड्डा

बोलून बातमी शोधा

. The site wall of Rajmata Udyan became a hangout for alcoholics

उद्यानाच्या मुख्य गेटमधून आत आल्यास बाजूस छोटी भिंत बांधण्यात आलेली आहे. या भिंतीजवळ उद्यानाला पाठकरून अनेकजण मूत्रविसर्जन करत असल्याचे निदर्शास येते. त्यामुळे महापालिकेने एवढा मोठा खर्च करून उभारलेल्या उद्यानाकडे महिलांसह ज्येष्ठ नागरिक पाठ फिरवत आहेत.

राजमाता उद्यानाची साईटभिंत बनला मद्यपींचा अड्डा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कात्रज : कात्रज परिसरातील राजमाता भुयारी मार्गाजवळ उभारण्यात आलेल्या राजमाता उद्यानाची भिंत मद्यपींचा अड्डा बनली आहे. महापालिकेने मोठा निधी खर्च करून उद्यानाची निर्मीती केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर शहरातील उद्याने चालू करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. परंतु, राजमाता उद्यानाच्या भिंतीलगत काहीजण मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले असून याकडे महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

उद्यानाच्या मुख्य गेटमधून आत आल्यास बाजूस छोटी भिंत बांधण्यात आलेली आहे. या भिंतीजवळ उद्यानाला पाठकरून अनेकजण मूत्रविसर्जन करत असल्याचे निदर्शास येते. त्यामुळे महापालिकेने एवढा मोठा खर्च करून उभारलेल्या उद्यानाकडे महिलांसह ज्येष्ठ नागरिक पाठ फिरवत आहेत. सायंकाळची वेळ ही उद्यानात फेरफटका मारायची वेळ असूनसुद्धा अशावेळी उद्यानात एकही नागरिक पाऊल ठेवत नाही.

त्रिमुर्ती चौकाकडून आल्यास राजमाता भुयारी मार्गाजवळून डावीकडे म्हणजेच कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या सेवारस्त्यावर हे सर्व आढळून येते. सेवा रस्त्याच्या डाव्या बाजूची भिंत ही लोक मूत्रविसर्जन करण्यासाठी वापरत असून उजव्या बाजूच्या भिंतीचा मद्यपी मद्यपान करण्यासाठी आधार घेतात. प्रशासनाने मद्यपींचा आणि मूत्रविसर्जन करणाऱ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही मागणी नागरिकांमधून होत आहे.

याठिकाणी मद्यपान करण्यास बंदी असून हा गुन्हा आहे. ही बाब पहिल्यांदाच आमच्या निदर्शनास आली आहे. माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. - जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन

मी या रस्त्यावरून नेहमी ये-जा करतो. उद्यानाच्या भिंतीचा आडोसा घेऊन मद्यपी नेहमीच या ठिकाणी रस्त्यावरच मद्यपान करत असल्याचे दिसून येते. तसेच, डाव्या भिंतीवर अनेकजण मूत्रविसर्जन करत असल्याने याठिकाणी उग्रवास येतो.
- अजित यादव, स्थानिक