पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण

Corona Patient
Corona Patient
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (ता. २९) एकूण ५९ हजार तीन सक्रिय कोरोना रुग्ण झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३२ हजार ८७५ सक्रीय रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ४ हजार ९६१ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसांतील एकूण रुग्णांत पुणे शहरातील २ हजार ५४७ जण आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी १३ हजार ९५४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार चालू आहेत.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात ४ हजार ९५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अन्य ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९ हजार ८७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक २४ जण आहेत. आज २२ हजार ९४० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ४७२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६५६, नगरपालिका क्षेत्रात २२४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६२ रुग्ण सापडले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्ण जास्त दिवसांतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ७७१, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ३१५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५३८, नगरपालिका हद्दीतील २४१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ८६ जणांचा समावेश आहे.

सद्यःस्थितीतील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ४५ हजार ४९ जणांचे गृहविलगीकरण  करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४ हजार ३४३, पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ हजार १५९, नगरपालिका हद्दीतील २ हजार ३०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३४ रुग्ण आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com