माओवादी संबंध प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन फेटाळला

court.jpg
court.jpg

पुणे : माओवादी संबंध प्रकरणातील सहा संशयित आरोपींचा जामीन न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. 


सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन आणि वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावेळी न्यायालयाने सर्व संशयित आरोपी हे बंदी असलेल्या (माओवादी) संघटनेशी संबंधित आहे. सर्वजण बंदी असलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असून संघटनेचे ध्येय धोरणा पूर्ण करण्यासाठी काम करतात असे सांगून हे लोकशाहीसाठी धोक्‍याचे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने यावेळी काढला.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटळातांना, सर्व संशयित एकमेकांसोबत फोनवर संपर्कात होते, महेश राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात कोरेगाव भीमा येथील दंगली बाबात उल्लेख सापडला आहे. रोना विल्सन यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात शस्त्र खरेदीचा उल्लेख मिळाला आहे. आत्मसमर्पण केलेल्या पहाडसिंग या नक्षलवाद्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अटक करण्यात आलेल्यांचा कामाबाबतची माहिती सांगितली आहे.

सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश यांना पत्र लिहिले असून त्यात ज्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी हल्ला करावी असे नमूद केले आहे. तसेच गडलिंग यांनी नक्षलवाद्यांचे आरोप असल्याचे वकील काम पाहतात. त्यांची तेवढीच मर्यादित भूमिका नसून ते माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. वरवरा राव यांच्याकडे मिळून आलेल्या कागदपत्रात माओवाद्यांच्या राजकीय आणि ध्येय धोरणा बाबत भाष्य केले सापडले आहेत. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये शहरी भागातील नक्षलवादाचे काम आदी कागदपत्रे सापडले आहे. ही सर्व कागदपत्रे, पत्रांचा विचार करून जामीन अर्ज फेटाळला असल्याचे निर्णयात नमूद केले आहे. पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com