Building Construction
sakal
पुणे - पुण्याच्या चारही बाजूंनी सुरू असलेल्या बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत असल्याची ओरड केली जात आहे. त्यातच आता पुढील चार वर्षांत पुण्यात तब्बल ६ कोटी ५० लाख चौरस फूट बांधकाम होणार आहे. त्यासाठी विकास आराखड्यातील रस्ते, मिसिंग लिंक, उड्डाणपूल अशा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे आवश्यक असून, त्याचे नियोजन केले जात असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.