कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर, कारण...      

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

-खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांच्या कार्यकाळात सहा महिन्याची मुदत वाढ

खडकी बाजार : खडकी कॅन्टोमेेंट बोर्डाच्या 2015 साली निवडूण आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ आता पुन्हा सहा महिन्याने वाढविण्यात आला आहे. भारत सरकार संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार साह यांनी हे आदेश दिले आहेत. तसे पत्र ही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्राप्त झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकी कॅन्टोन्मेंट  बोर्डास प्राप्त झालेल्या आदेशात असे म्हटले आहे की, प्रशासकीय कारणांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार, कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार सर्व निवडून आलेल्या सदस्यांच्या पदाची मुदत वाढविली जात आहे. ही मुदत वाढ सहा महिने असल्याचे सदर पत्रात सूचित करण्यात आले आहे.

देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डातील निवडून आलेल्या सदस्यांची मुदत 10 फेब्रुवारी 2020 रोजी संपली होती त्यावेळेस सुद्धा संरक्षण मंत्रालयाने सदर सदस्यांची मुदत सहा महिन्यांसाठी वाढवली होती ही मुदत 10 ऑगस्ट 2020 संपणार होती त्याआगोदरच 5 ऑगस्ट रोजी संरक्षण मंत्रालयाने सर्व सदस्यांची मुदत पुन्हा सहा महिने म्हणजे 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवली आहे. अशी माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांनी सकाळ ला दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six-month extension in the tenure of Khadki Cantonment Board members