पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुरू असलेले ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण होण्यास आणखी सहा महिने लागणार आहेत. बोगद्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. बोगद्याला जोडणाऱ्या टायगर दरीतील ‘केबल स्टेड’ पुलाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.