पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर; पुणे ग्रामीणमधील ६ जणांची निवड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहा पोलिस अंमलदारांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

लोणी काळभोर (पुणे) : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहा पोलिस अंमलदारांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

दरम्यान 2017 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी राज्यभरातून 4559 पोलीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1451 उमेदवार हे मैदानी चाचणी परीक्षेत पात्र झाले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहा पोलिस अंमलदारांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

शिवजयंतीनिमित्त खास एसटी; स्वारगेट ते रायगड दर रविवारी बससेवा​

निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) उमाकांत गोपीनाथ कुंजीर (स्थानिक गुन्हे शाखा) 
२) राहुल बाळासाहेब भागवत (शिरूर)
३) सूर्यकांत राजाराम ओंबासे (वेल्हा) 
४) शरद बिरजू लोहकरे (वडगाव मावळ महामार्ग) 
५) अविनाश दराडे (बारामती)
६) नाथा बबन गळवे (बारामती)

अशी उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

शनिवारवाड्याला नाव कसं मिळालं? पुण्याच्या ऐतिहासिक वास्तूविषयी सर्वकाही एका क्लिकवर!​

पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. यापूर्वी तीन वेळा राज्यसेवा परीक्षा दिली होती, तरीही यश मिळाले नाही. तरीही न खचता डगमगता नवीन उमेदीने चिकाटीने अथक परिश्रम केल्यानंतर यावेळी यश संपादन केले. या यशामध्ये कुटुंब, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली.
- उमाकांत कुंजीर, नूतन पोलिस उपनिरीक्षक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six police officers of Pune Rural Police selected as PSI through MPSC