
पुणे : पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी हडपसर, वडगाव खुर्द, खराडी येथे घरकुल बांधणे आणि लाभार्थ्यांबरोबर करार करण्याच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने सोमवारी मंजुरी दिली.
समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शहराच्या विकास आराखड्यात आर्थिकदृष्ट्या मागास आणि घर नसलेल्यांकरिता आरक्षित जागेवर 6 हजार 264 घरे बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता. पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हडपसर, वडगाव खुर्द आणि खराडी येथील आरक्षित जागेचा उपयोग केला जाणार आहे. खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. कुठेही मालिकीचे घर नाही आणि वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आतमध्ये आहे, अशा नागरिकांकडून अर्ज मागविले होते.
महापालिकेकडे सुमारे 44 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी पात्र ठरणाऱ्यांना योजनेतील घर मिळणार आहे. या प्रस्तावावर विरोधकांनी दोन उपसूचना केल्या होत्या. योजनेला महापौर आवास योजना असे नाव द्यावे आणि योजनेसाठी जीएसटी माफ करावा, अशा दोन उपसूचनांचा समावेश होता. या दोन्ही उपसूचना फेटाळण्यात आल्या.
प्रस्ताव मंजूर करण्यात घाई : बागवे
इमारतींचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वीच ऑगस्टमध्ये बांधकामाच्या निविदा काढल्या गेल्या. योजनेसाठी 99 हजार 224 चौ. मी. जागा आवश्यक असून, सुमारे 75 हजार चौ. मी. जागा महापालिकेच्या ताब्यात आली नाही. प्रस्तावातील अटी आणि शर्थींमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होईल, लाभार्थ्यांना आठ ते दहा लाख रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) यापेक्षा कमी रकमेत घर मिळत आहे, असे विविध मुद्दे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी उपस्थित केले होते.
आरक्षित जागेवर घरे बांधणार
6 हजार 264
योजनेसाठी अपेक्षित खर्च
650 कोटी रुपये
केंद्र सरकारचा निधी
94 कोटी रुपये
राज्य सरकारचा निधी
62 कोटी 64 लाख रुपये
लाभार्थ्यांना अर्थसाह्य
अडीच लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.