कौशल्य आधारित शिक्षण उद्योजक घडविणारे ः रामचंद्र दरे

कौशल्य आधारित शिक्षण उद्योजक घडविणारे ः रामचंद्र दरे
Published on

PNE26W34728
अहिल्यानगर ः न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन अप्लाइड सायन्सेस’ विभागाच्या स्वागत समारंभात मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे समवेत पदाधिकारी.

कौशल्य आधारित शिक्षणात भवितव्याच्या संधी
रामचंद्र दरे ःकेवळ पदवी मिळवून चालणार नाही

अहिल्यानगर, ता. १५ ः आजच्या काळात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष कौशल्य असणे अनिवार्य आहे. तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टाने अभ्यास करावा. ज्यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे, त्यांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.

न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन अप्लाइड सायन्सेस’ विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दरे बोलत होते. संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी क्षितिज गुंड आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. सागडे यांनी डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या तीनही पदवी अभ्यासक्रमांचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी कृषी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) चे महत्त्व सांगत जागतिक स्तरावरील विविध उदाहरणे दिली. विभाग प्रमुख प्रा. अरुण गांगर्डे यांनी प्रास्ताविकातून ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज’च्या वाटचालीची माहिती दिली. त्यांनी विभागात उपलब्ध असलेले अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन डिझाइन केलेले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असलेले अभ्यासक्रम याबद्दल माहिती दिली. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. मंजिरी कारखिले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एम. बी. गोबरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com