

पान ६ संभाजीनगर + फोटो
---------------
बीड येथे कौशल्यवर्धन केंद्र सज्ज
युवकांचा रोजगार संधीसाठी होणार कौशल्य विकास
बीड : युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या व आवश्यकतेनुसार सर्व प्रशिक्षणाने परिपूर्ण विद्यार्थी निर्माण करण्याच्या उद्देशाने बीड येथे कौशल्यवर्धन केंद्र अर्थात सी-ट्रिपल आयटी संस्थेची उभारणी करण्यात आली आहे.
विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी किंवा पदविका पूर्ण केल्यानंतरही नोकरी मिळविण्यात युवकांना येणारी अडचण ओळखून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कौशल्यवर्धन केंद्राबाबत आढावा बैठक झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, टाटा टेक्नॉलॉजीचे कार्यक्रम संचालक अनिल ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इघारे, यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले, स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बीड जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक उद्योग जगताला नेमके कोणते प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे, हे लक्षात घेऊन येथे थेट नोकरी देणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बेरोजगार आणि शिक्षण घेणाऱ्या युवकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. यात प्रामुख्याने उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन आणि प्रगत संगणकीय प्रणाली यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश असतो. नामवंत औद्योगिक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने ही केंद्रे उभारली जातात. यामुळे स्थानिक पातळीवर संशोधन आणि नवोपक्रमांना गती मिळते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इघारे यांनी केले.
..कोट..
थेट नोकरीची हमी देणारे प्रशिक्षण आणि सोयीस्कर वेळापत्रक यामुळे बीड जिल्ह्यातील युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी
....
१८ कोर्सेस उपलब्ध...
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे नियमित प्रवेश आणि शिक्षण सुरू असतानाही, या संस्थेमधील कोर्सेस अंशकालीन म्हणून अत्यंत सहजपणे पूर्ण करू शकतात. जे विद्यार्थी बीड शहरापासून दूर ग्रामीण भागात राहतात किंवा ज्यांना रोज ये-जा करणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष पाऊल उचलले आहे. या कोर्सेसचे वर्ग शनिवार आणि रविवारी देखील भरविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश मोफत असणार आहे. तसेच प्रवेश परीक्षेतून विद्यार्थ्यांनी निवड केली जाणार आहे. प्रत्येक कोर्सेसला २० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. आजपर्यंत एकूण १८ कोर्सेस उपलब्ध झाले असून ते तीन सत्रात राबविले जाणार आहेत, तसेच यासाठी अद्ययावत ९ लॅब तयार करण्यात येत आहेत.
.....
फोटो सोबत जोडला आहे
बीड : कौशल्यवर्धन केंद्राविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व उपस्थित अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.