Skills Development: ‘’माध्यमिक शालेय शिक्षणात वयाच्या या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात इंटर्नशिपच्या माध्यमातून काम करून स्वतःच्या आवडीचा शोध घेणे ही उल्लेखनीय बाब आहे. यामुळे त्यांना भविष्यात योग्य करिअर निवडण्यास मदत होईल’’ असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी, आशा उबाळे यांनी केले. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन माध्यमिक शाळा, शुक्रवार पेठ येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा 80 तासांची इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल आयोजित विद्यार्थी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.