
एक काळ होता जेव्हा भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएम्ई) मर्यादित संसाधने आणि पारंपारिक पद्धतींपुरतेच मर्यादित होते. परंतु कालांतराने या विचारसरणीतही बदल झाला आहे. आज हेच एमएसएम्ई उद्योगक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहेत, ज्यामुळे देशातील ११ कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे.