पुण्यात २५ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय परिषद

पुण्यात २५ नोव्हेंबरपासून
आंतरराष्ट्रीय परिषद
Published on: 

पुणे, ता. १६ : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र अध्ययन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा सायन्स आणि क्लाऊड कम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट कॉम्प्युटिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (आयसीएससीएसडी २०२६) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (व्हीआयटी), पुणे येथे २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान ही परिषद होणार आहे. ‘आयईईई पुणे सेक्शन’ हे परिषदेचे तांत्रिक सहप्रायोजक आहे.
या परिषदेसाठी ‘बार्कलेज’चे आनंद चित्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, आयईईई रिजन ४च्या शैक्षणिक उपक्रम विभागाच्या अध्यक्षा डॉ. अनु गोखले गेस्ट सन्माननीय अतिथी, तर ‘एनव्हिडिया’च्या सोनाली पित्रे प्रमुख वक्त्या म्हणून सहभागी होणार आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र अध्ययन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, एज आणि क्लाऊड कम्प्युटिंग यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना संशोधन व विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या परिषदेला राजकुमार अगरवाल, भरत अगरवाल आणि डॉ. बिपिन सुळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. राजेश जालनेकर व डॉ. विवेक देशपांडे (जनरल चेअर), डॉ. परीक्षित महल्ले व डॉ. विजय माने (को-चेअर), तसेच डॉ. शीतल डोंगरे आणि आयईईई पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. अमर बुचडे यांच्या पुढाकाराने या परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.