esakal | "स्मार्ट हेल्मेट' मोजणार शरीराचे तापमान 
sakal

बोलून बातमी शोधा

smart-helmet

बीजेएसतर्फे शरीराचे तापमान मोजण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे. या मुळे अधिकाधिक लोकांच्या शरीराचे तापमान कमी वेळेत मोजणे शक्‍य झाले आहे. या उपक्रमाचा फायदा सरकारलाही होत आहे.

"स्मार्ट हेल्मेट' मोजणार शरीराचे तापमान 

sakal_logo
By
अक्षता पवार, सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजणे आव्हानात्मक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या वतीने 'स्मार्ट हेल्मेट'चा वापर केला जात आहे. या हेल्मेटच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी स्पर्शही न करता एका मिनिटात 200 लोकांच्या शरीराचे तापमान मोजले जाते. 

बीजेएसने यापूर्वी राज्यात "डॉक्‍टर आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दीड महिन्यांत 15 लाख नागरिकांची तपासणीही केली. दरम्यान, आता बीजेएसतर्फे शरीराचे तापमान मोजण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे. या मुळे अधिकाधिक लोकांच्या शरीराचे तापमान कमी वेळेत मोजणे शक्‍य झाले आहे. या उपक्रमाचा फायदा सरकारलाही होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथा म्हणाले, "डॉक्‍टर आपल्या दारी' या उपक्रमामध्ये दिवसाला आम्ही 200 नागरिकांची तपासणी करत होतो. तसेच लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु, या हेल्मेटमुळे केवळ एका मिनिटात दिवसभरात पूर्वीपेक्षा जास्त लोकांचे तापमान मोजले जात आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन नागरिकांना स्पर्श न करता आम्ही त्यांचे तापमान मोजत आहोत. हेल्मेटमधील कॅमेराच्या साह्याने 'थर्मल इमेज' घेतली जाते. या हेल्मेटमुळे संशयित लोकांना शोधण्यास मदत मिळते.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडोनेशिया, चीन, रशिया, इटली व संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात असून भारतात पहिल्यांदाच आम्ही वापर करत आहोत. भारतात सुद्धा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे आधुनिक हेल्मेट यावर उपयुक्त ठरेल. 
- शांतिलाल मुथा, संस्थापक, बीजेएस 
 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैशिष्ट्ये 
- स्पर्श न करता शरीराचे तापमान मोजले जाते 
- क्‍यूआर कोडच्या मदतीने मोबाईलशी जोडणे शक्‍य 
- शरीराचे तापमान मोजून त्याचे छायाचित्र (थर्मल इमेज) काढण्यास सक्षम 
- एका तासात 12 हजार तर एक दिवसात एक लाख लोकांच्या शरीराचे तापमान मोजले जाते 
- गर्दीची ठिकाणे व कंटेन्मेंट झोनसाठी उपयुक्त