

दौंड, ता. १० : दौंड शहर व परिसरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) स्मार्ट मीटर बसविण्यावरून वीज ग्राहक आणि ‘महावितरण’चे अधिकारी-कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्मार्ट मीटरसंबंधी शंकांचे निरसन करण्याकरिता बैठक बोलविण्याची मागणी दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
‘महावितरण’चे दौंड येथील उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. उपनगराध्यक्ष छाया थोरात, नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते योगेश कटारिया व नागरिक हित संरक्षण मंडळाच्या पालिका सदस्यांनी ही मागणी केली आहे.
दौंड शहरातील तेरा प्रभागात ‘महावितरण’कडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून, हे स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक असताना परस्पर मीटर बदलले जात आहेत. त्यामुळे वादाचे प्रसंग घडत आहेत. जुन्या आणि नवीन स्मार्ट मीटरच्या रीडिंगमध्ये मोठी तफावत असल्याच्या तसेच स्मार्ट मीटर कार्यान्वित झाल्यानंतर वीजदेयकाच्या रकमेत मोठी वाढ होत असल्याची ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी ‘महावितरण’ने स्पष्टीकरण द्यावे. स्मार्ट मीटरसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे. यासाठी दौंड नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची नगरपालिका कार्यालयात बैठक बोलावून सविस्तर चर्चा करण्याची सूचना निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.