esakal | Pune : सोसायट्यांना स्मार्ट कवच!
sakal

बोलून बातमी शोधा

Society

सोसायट्यांना स्मार्ट कवच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रीच्या वेळी किंवा अगदी भरदिवसा देखील सोसायट्यांमधील बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरटे घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेतात. त्याची पोलिस दफ्तरी नोंदणीही होते. घरमालक चोरी गेलेला ऐवज पुन्हा मिळावा, यासाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवत बसतो. पण आता शहरातील बहुतांश मोठ्या सोसायट्या मात्र ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. चोरी, दरोड्यासारखे गुन्हेच नव्हे, तर सोसायटीचा एकूणच कारभार चालविण्यासाठी सोसायट्यांकडून विविध प्रकारच्या मोबाईल ॲपचा वापर केला जात आहे. त्यामुळे चोरी, दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्यांवर काही प्रमाणात आळा बसण्यास उपयोग होऊ लागला आहे. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये मागील काही वर्षांपासून मोठमोठ्या सोसायट्या, गृहसंकुल उभे राहिले. मात्र दिवाळी, नाताळ, मे महिन्यात शाळांना लागणाऱ्या सुट्ट्या अशा वेगवेगळ्या सुट्ट्यांच्या हंगामांमध्ये संबंधित सोसायट्यांमध्ये हमखास चोरी, दरोड्याचे गुन्हे घडल्याच्या घटना घडतात.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

अनेकदा चोरट्यांकडून एकाच सोसायट्यांमधील पाच-दहा घरांमध्ये चोरी करण्यापर्यंतचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी मागील काही वर्षांपासून शहरातील बहुतांश सोसायट्यांकडून सुरक्षिततेसाठी विविध प्रकारच्या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला जाऊ लागला आहे.

माय गेट, जिओ गेट, गेटकिपर, अपना कॉम्प्लेक्‍स, लोकेटेड असे अनेक मोबाईल ॲप सध्या उपलब्ध आहेत. बहुतांश सोसायट्यांकडून चांगली व सर्वंकष सेवा, सुरक्षिततेची हमी देणाऱ्या मोबाईल ॲपचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारामध्ये अनोळखी व्यक्तींचा येण्याचा मार्ग बंद झाला आहे. अत्यावश्‍यक सेवा, घरकामगार, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तू पोचविणारे डिलिव्हरी बॉय यांची सुरक्षारक्षकाकडून संबंधित ॲपवर नोंदणी केली जाते. त्याबाबत सदनिकाधारकांना मेसेज गेल्यानंतर व त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश मिळतो. त्यामध्ये मेसेज, पॅनिक अलर्ट, इंटरकॉमसारख्या सुविधा सोसायट्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. परिणामी चोरट्यांपासून सोसायट्यांचे संरक्षण होण्यासही मदत होऊ लागली आहे.

असे आहेत फायदे...

 • अनोळखी व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश

 • मिळत नाही

 • प्रवेशद्वारावरच नोंदणी होऊन सदनिकाधारकांच्या परवानगीनंतरच मिळतो प्रवेश

 • दैनंदिन सुविधा पुरविणाऱ्यांची इत्थंभूत माहिती ठेवणे शक्‍य

 • लहान मुले सोसायटीच्या

 • बाहेर पडणार नाहीत,

 • यावरही ठेवले जाते लक्ष

 • सोसायटीची देखभाल दुरुस्ती, अन्य खर्च, अकाउंट, रेकार्ड ठेवता येते

घरफोडी व दरोड्याचे गुन्हे (सप्टेंबर २०२१ पर्यंत)

 • दरोडे : १४

 • घरफोडी : ३१४

 • राज्यातील एकूण गृहनिर्माण संस्था : एक लाख

 • पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था : १८ हजार

 • अडीचशेपेक्षा कमी सभासदसंख्या असलेल्या सोसायट्या : ८० हजार

 • अडीचशेपेक्षा कमी सभासद असणाऱ्या सोसायट्या : १५ हजार

"आम्ही ‘माय गेट’ या ॲपचा वापर करतो. कोणालाही सोसायटीमध्ये यायचे असल्यास त्याची सुरक्षारक्षक संबंधित ॲपवर नोंद घेतात. सदनिकाधारकांनी परवानगी दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीला सोसायटीत प्रवेश मिळतो. लहान मुलांच्या येण्या-जाण्याचीही नोंद ठेवल्याचा फायदा होतो."

- पीयूष चौधरी, खजिनदार, गगन लॅव्हिश को-ऑप हौसिंग सोसायटी, पिसोळी

loading image
go to top