

‘सकाळ’चा
आज हास्योत्सव!
एखादा भन्नाट जोक ऐकून शेवटचं कधी पोट धरून हसलात? मित्रांच्या ग्रुपमध्ये गप्पा मारताना टेन्शन विसरून खळखळून कधी हसला होतात? आठवत नसेल तर आज हसण्याची संधी आहे! कारण आज (१ नोव्हेंबर) आहे ‘स्माईल डे’! आजच्या दिवशी ना कसली स्पर्धा, ना कसली धावपळ... फक्त हसायचं आणि आपलं हसू सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं! ‘एपी ग्लोबल’ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने यासाठी खास प्लॅन केला आहे. तुम्ही कुठेही असा, फक्त एक छानसा हसरा फोटो शेअर करा आणि या आनंदाच्या उपक्रमाचा भाग व्हा.
तुमचं हसू, इतरांचाही आनंद!
या उपक्रमात सहभागी होणंही सोपं आहे. आपल्या मोबाईलमध्ये हसतानाचा एक छान फोटो क्लिक करायचा. त्यानंतर #SmileDay हॅशटॅगसह तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. यासाठी खास ‘स्माईल फ्रेम’ उपलब्ध करून दिली जाणार असून, ती आपल्या फोटोला लावता येईल. त्यानंतर हा फोटो इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर शेअर करता येणार आहे.
तुमच्या चेहऱ्यावरील हसू पाहून मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि परिचितांच्याही चेहऱ्यावर हसू फुलावं, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे केवळ फोटो पोस्ट करण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून, एकमेकांमध्ये आनंद पसरवण्याची ही एक संधी आहे.
हसऱ्या चेहऱ्यांची ‘स्माईल वॉल’
या उपक्रमातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे ‘स्माईल वॉल’. सहभागी नागरिकांनी शेअर केलेले हसरे चेहरे एकत्रितपणे या ‘स्माईल वॉल’वर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांचे हसू एकाच ठिकाणी एकत्र येऊन आनंदाचा एक अनोखा अनुभव निर्माण होणार आहे. आजच्या दिवशी काही क्षणांसाठी का होईना, रोजच्या चिंता आणि ताण बाजूला ठेवून मनमोकळं हसा. कारण तुमचं एक हसू तुमचा दिवस आनंदी करण्यासोबतच दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर हसू आणू शकतं. ‘सकाळ’च्या या हास्योत्सवात सहभागी होऊन आपल्या हसण्याने आनंदाची ही साखळी पुढे नेऊया!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.