

फक्त साताऱ्यासाठी
--------------------
पुणे, ता. १८ : रविवारच्या सुटीचा लाभ घेत पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रचार दौरा करून महामेळावा, बैठकांमध्ये सहभागी होत पदवीधरांना आवाहन केले.
शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच व्यासपीठावर होते.
या वेळी आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी आमदार मदन भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, राजू भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, सभापती महेश गाडे, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे, सुनील काटकर आणि धनंजय जांभळे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘‘दुर्गम भागातील पदवीधर तरुणांना शिक्षणासोबत आपल्याच भागात रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा पाटण भागाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो विधान परिषदेत ठामपणे मांडण्याचा माझा निर्धार आहे,’’ असे डॉ. जाधव यांनी पाटण येथील मेळाव्यात नमूद केले. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजित पाटणकर, धैर्यशील कदम आणि भरत ऊर्फ नाना पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. स्मिता जाधव यांनी साताऱ्यातील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची सदिच्छा भेट घेतली.
सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना रविवारी (ता. १८ ) वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डॉ. स्मिता जाधव यांनी म्हटले आहे, की कठीण प्रसंगातही धैर्याने उभे राहून राज्याच्या सेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्राताई या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्थान आहेत.
---------------------
कलावंतांचा पाठिंबा जाहीर
पुणे ः ‘संवाद पुणे’ आणि ‘ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ट्रस्ट’ या संस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना विविध क्षेत्रातील कलावंतांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अष्टमीच्या दिवशी नवदुर्गेची पूजा म्हणून विविध कला घटकातील नऊ महिलांना या प्रसंगी गौरविण्यात आले. नृत्यकलेतील पंडिता शमा भाटे आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माजी विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्या हस्ते डॉ. संगीता बर्वे, लीना आढाव, डॉ. सुखदा खांडगे, सानिया चौधरी, मधुरा कुलकर्णी, योगिता गोडबोले, अपर्णा चोथे, अदिती द्रविड यांना गौरव करण्यात आले.
फोटो ः 60094
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.