अबब! स्विमिंग पुलमध्ये नाग शिरतो तेव्हा..

The snake enters the society swimming pool at kothrud
The snake enters the society swimming pool at kothrud
Updated on

कोथरुड :सकाळी शतपावली करायला निघालेल्या सोसायटीमधील सभासदांनी जलतरण तलावात एक भला मोठा नाग विहार करताना पाहिला आणि त्यांची धांदल उडाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एरंडवणा येथील हिमाली सोसायटीच्या जलतरण तलावा मध्ये चक्क एक भलामोठा नाग जलविहार करताना दिसला आणि त्याला पहायला उत्सुकतेने जमा झाले. सगळ्यांची धांदल उडाली. पाच फुट लांब असलेला आणि मोठा फणा असलेला हा नाग पहायला उत्सुकतेने सोसायटीतील सदस्य जमा झाले. सोसायटीच्या सचिव रुपा हुडेकर यांनी फोन करुन सर्पमित्रांना बोलावले.

रुपा हुडेकर म्हणाल्या की, सकाळी आमच्या सोसायटीत साप आढल्यावर आम्ही तातडीने सर्पमित्र प्रितम काकडे, कुंदन रीठे यांना कळवले. हे दोघे सर्पमित्र वारजे गणपती माथा येथून तातडीने आले हे विशेष. पूर्वी येथे शेतजमिन असल्याने अधूनमधून सर्प दिसतात परंतु जलतरण तलावात प्रथमच साप आल्याने  सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रितम काकडे म्हणाले की, पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशन येथे आम्ही प्रशिक्षण घेतले आहे. सकाळी साडेसात वाजता आम्हाला फोन आल्यावर आम्ही आठपर्यंत सोसायटीमध्ये पोहचलो. जलतरण तलावाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न हा नाग करत होता. परंतु त्याला बाहेर पडता येत नव्हते. आम्ही या नागाला कोणतीही इजा न होवू देता सर्प मित्रांनी ताब्यात घेतले व नंतर त्याला खडकवासला येथील एनडीएच्या जंगलात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com