पुणे : ग्रामीण भागात वाढलाय सापांचा वावर; सर्पदंश झाल्यास...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

साप न येण्यासाठी ही घ्या काळजी 

सर्पदंश झाल्यास काय करावे...

कोळवण : पाऊस सुरू झाला की सापांचा वावर जमिनीवर वाढतो. त्यामुळे सर्पदंशाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. सध्या पाऊस पडल्याने सापांच्या बिळात पाणी गेले की, निवारा शोधत, अन्नाच्या शोधात साप बाहेर पडत आहेत. यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. साप आढळल्यास सर्पमित्रांना पाचारण करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मे, जून महिना म्हणजे नाग, घोणस, मण्यार, धामण या सापांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे या सापांची पिल्लेही भक्ष्य शोधत बाहेर पडत आहेत. लोकांना साप दिसला की ते मारतात. त्यामुळे माणसांना धोका वाटला की, साप शत्रूपासून सुरक्षित होण्यासाठी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात डंख मारत असल्याने सर्पदंश होण्याची भीती असते. बिनविषारी सापांपासून मानवाला काही अपाय नसतो ; पण अनुवंशिक भीती, शास्त्रीय अज्ञान व माहितीच्या अभावामुळे काही लोक दिसेल तो साप मारून टाकत आहेत. काहीजण सर्पमित्रांना बोलवून सापांना परिसरातून बाहेर काढत आहेत. साप घरात आल्यास घाबरू नका. शांत राहा. जाणकार सर्पमित्राला बोलवा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबून त्यावर लक्ष ठेवा. लहान मुले, पाळीव प्राण्यांना त्यापासून लांब ठेवा. सापाजवळ जाणे, फोटो काढणे, असे करू नये. नाग, मण्यार, घोणस,फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत यांचा दंश प्राणघातक असतो अशा सापांपासून सावध राहावे. अनुभवी जाणकार सर्पमित्रला संपर्क करावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साप न येण्यासाठी ही घ्या काळजी 

घराच्या भिंती, कुंपनाच्या भिंती यांना पडलेली बीळं बुजवावेत. त्यामधील उंदरांना खाण्यासाठी साप येण्याची शक्यता असते. घराजवळ पालापचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड-विटाचे ढीग, लाकडांचा साठा करून ठेवू नये. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. खिडक्या-दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरपण, गोवऱ्या जमिनीपासून थोड्या उंचीवर माच करुन ठेवा. गवतातून चालताना पायात बूट असावेत. अंधारातून जाताना नेहमी बॅटरी सोबत ठेवा. जमिनीवर झोपू नका. साप निशाचर असल्याने त्याचा वावर रात्री जास्त असतो. जमिनीवर झोपताना अंथरुण भिंतीलगत टाकू नका. जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घबरून जाता स्तब्ध उभे राहा. त्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजूला फेकल्यास त्या वस्तूकडे सापाचे लक्ष केंद्रित होताच तुम्ही बाजूला जावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्पदंश झाल्यास काय करावे...

सर्पदंश झाल्यास त्वरित नजीकचे शासकीय रुग्णालय गाठावे. घाबरून न जाता मानसिक शारीरिकरित्या स्थिर राहावे. सर्पदंश झाला असला तरीही सापाकडे निरखून पाहावे. कारण बरेचदा डॉक्टरांनी विचारल्यास सापाचे वर्णन सांगता येत नाही. सर्पदंश झालेल्या ठिकाणी जखम सतत पाणी साबणाने स्वच्छ धुवावे. घाबरल्यास रक्ताभिसरणात जोराने विष पसरते. 

पुणे, महाराष्ट्र, भारत

साप महत्त्वाचा घटक...

साप दिसल्यास घाबरू नका. सर्पमित्रांना बोलवा, सर्पमित्र येईपर्यंत सापावर लक्ष ठेवा. साप हे उंदीर, पाल यांच्या संख्येवर साप नियंत्रण ठेवतात. पर्यावरण संतुलनात सापांची भूमिका महत्वाची आहे.

- देवाशिष बॅनर्जी, सर्पमित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snakes have increased in rural areas Kolwan Pune