Shirur Crime News: शिरूर नशामुक्तीसाठी तहसिलसमोर सत्याग्रह; वाढत्या गुन्हेगारी, एमडी व अवैध धंद्यांविरोधात नीलेश वाळूंज आक्रमक

शिरूर तालुका नशामुक्त करण्यासाठी व वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर नीलेश वाळूंज यांचा अनिश्चितकालीन सत्याग्रह सुरू
शिरूर : शहर व परिसरातील बेकायदा दारूविक्री, अवैध धंदे व गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्याबरोबरच कायदा - सुव्यवस्था राखणेकामी उपाययोजनांच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी बुधवार पासून तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले.

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी, तरूणाई भोवतीचा एमडी या अंमली पदार्थाचा विळखा, हातभट्टी दारूचे पेव, अवैध धंदे, जुगार, मटका, चोऱ्या, दादागिरी, भाईगिरी आणि वाढत्या गुन्हेगारीकडे शासनाचे व विशेषतः पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कायदा - सुव्यवस्था राखण्याकामी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीच्या मागणीसाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळूंज यांनी बुधवार (ता. १५) पासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले. शिरूर तालुका नशामुक्त करण्याबरोबरच, कायदा - सुव्यवस्था राखण्याकामी ठोस उपाययोजना लागू होईपर्यंत हा सत्याग्रह चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com