समाजाच्या ऋणातून उतराई होत जपली सामाजिक बांधीलकी 

tare.jpeg
tare.jpeg

पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले. 

कर्मयोगी रघुनाथ येमूल गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालयात विविध वस्तूंचे संकलन शिबिर घेण्यात आले होते. 
पुणेकरांनी या संकलन मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिस्कीटचे बॉक्‍स, पिण्याचे पाणी, साखर, तेल व अन्नाच्या पाकिटांसह विविध औषधे, सॅनिटरी नॅपकिन जमा झाले. उबदार कपड्यांसह दोन टन धान्य जमा झाले. जमा झालेले सर्व साहित्य सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कोल्हापूरमधील शिरोळ, राधानगरी, चंडगड व इतर तालुक्‍यांत वितरित करण्यात आले. 
या संकलन मोहिमेचे आयोजन जागृती ग्रुपचे अध्यक्ष राज देशमुख, डॉ. उमाकांत खेडेकर, मनीषा वाघमारे, सचिन कदम, विजय दरेकर, ऋषिकेश गायकवाड, ज्योती महाडिक, दीपाली सनपुरकर, कपिल पाटील, दिलीप शेलवंटे आदींसह सर्व सदस्यांनी केले. 

जागृती ग्रुपच्या वतीने अशी दरवर्षी संकलन मोहीम राबवली जाते. जीवनावश्‍यक वस्तू जमा करून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात दिले जातात. हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून अविरत चालू आहे. 

शिबिरासाठी आर्थिक मदत डोनरकार्ट या ऑनलाइन वेबसाइटच्या वतीने सारंग बोबडे, सुशांत पाटील, नीलेश करंदीकर यांनी केली. साहित्याच्या वाहतुकीसाठी दत्ता संगोळकर, नीलिमा धायगुडे, गणेश बागडे यांनी मदत केली. ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कर्नल सुरेश पाटील, रितू छाब्रिया, उद्योजक विकास मते आदींचे सहकार्य लाभले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com