सोशल डिस्टन्सिंगचा उत्तमनगर, शिवण्यात फज्जा 

shivane1.
shivane1.
Updated on

खडकवासला : शिवणे, उतमनगर परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. मात्र किराणा माल, भाजीपाला व दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडताना दिसत आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची धावपळ होत असल्याचे दिसून येते. या परिसरात मागील आठवड्यात किराणामाल, भाजीपाला व दूध डेअरीसाठी चार तासांचा अवधी दिला होता, परंतु अचानक भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली. त्यामुळे आता पुन्हा वेळ कमी करण्यात आली असून २ तासांचा अवधी देण्यात आला आहे.

एकाच घरातील तीन- चार व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर भाजीविक्री करीत होते. त्यामुळे पोलिस, लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनांनी मिळून दुकाने दोन तासच उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवणे, उत्तमनगर व्यापारी संघनेचे अध्यक्ष सारंग राडकर यांनी सांगितले. 

काही ठिकाणी भाजीचा टेम्पो सोसायटीपर्यत येतो. परंतु भाजी घेण्यासाठी गर्दी उसळते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे स्थानिक रहिवासी ज्योती देशकर यांनी नमूद केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com