

सिंहगड रस्ता, ता. १८ : येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रहार सामाजिक संघटना, दिव्यांग क्रांती संघटना, दिव्यांग प्रहार चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना पक्ष, खोतवाडी-इचलकरंजी यांच्यातर्फे आयोजित शिव-भीम महोत्सवात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कांबळे हे ‘पीएमपी’मध्ये वाहक म्हणून कार्यरत असून, दिव्यांग व निराधारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. याप्रसंगी प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवडे, विकास गायकवाड उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.