ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन | Social Worker Anil Awachat Passes Away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Worker Anil Awachat Passes Away

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिथयश लेखक होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं. (Social Worker Anil Awachat Passes Away)

डॉक्टर अनिल अवचट यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. आज (गुरुवार) सकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर ते कोमामध्ये गेले आणि सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचे निधन झाले.

मुक्तांगणची स्थापना करून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केलं. महाराष्ट्र फाऊंडेशचा पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. रिपोर्टिंगचे दिवस, स्वतःविषयी, पौर्णिमा, अमेरिका यासह त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. रिपोर्ताज हा लेखनचा प्रकार त्यांनी मराठीत लोकप्रिय केला आहे. त्यांनी मुलांसाठी ही लेखन केले आहे.

मुक्तांगणचे सध्याचे अध्यक्ष आनंद नाडकर्णी यांनी अनिल अवचट यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जीवन साधेपणाने कसे जगायचे हे बाबाने शिकवले. 15 जानेवारीला पडले आणि शस्त्रक्रिया करावी लागली, हे काय ते निमित्त झालं, त्यातून बाबा सावरले नाहीत. अतिशय शांतपणे निर्वाण झालं. त्यांच्या अहम भावाचे कधीच निर्वाण झाले होते. आता केवळ शरीराचे निर्वाण असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आनंद नाडकर्णी म्हणाले की, बाबामधला निखळ स्नेहभाव कायम राहणार आहे. अनिल अवचट यांच्या स्मृतिसाठी सृजन सन्मान पुरस्कार आम्ही देणार आहोत. मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राचे काम सतत चालू ठेवू, तीच बाबासाठी श्रद्धांजली ठरेल.

Web Title: Social Worker Anil Awachat Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top