समाजाच्या दानातून गरिबांना निवारा

प्रसाद पाठक
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी अन्न, वस्त्र आणि निवारा या त्याच्या मूलभूत गरजा आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून भाईचारा फाउंडेशनतर्फे गरजूंना मोफत निवारा बांधून देण्यात येतो. समाजाच्या आर्थिक मदतीवर गरजू कुटुंबांना मोफत घरे बांधून देण्याचा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून फाउंडेशन राबवीत आहे. 

संघटनेतर्फे इंदिरानगर (गुलटेकडी) येथील ६५ घरे, भीमनगर (मंगळवार पेठ) येथे ७२ घरे, लक्ष्मीनगर (येरवडा) येथे चार घरे बांधून दिली आहे. सध्या मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगर येथे आगीत जळालेली ७४ घरे बांधण्यात येत आहेत. या कार्यासाठी नगरसेवक सुनील कांबळे यांचेही सहकार्य लाभल्याचे संघटनेचे अध्यक्ष शब्बीर शेख यांनी सांगितले. सर्वधर्मीय नागरिक या कामी मदत करत असल्याचा उल्लेख शेख यांनी केला. 

शेख म्हणाले, ‘‘एक वेळचे जेवण मिळणेही अनेकांना मुश्‍किल होते. गरिबी आम्ही जवळून पाहिली आहे. गरिबांचे दुःख अनुभवले आहे. त्यातूनच समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना जागृत झाली आणि गरिबांना मोफत घरे बांधून देण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र, त्यासाठी आम्ही मशिदीमध्ये जाऊन नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन करतो. आपल्या आर्थिक उत्पन्नापैकी दोन टक्के जकात समाजासाठी खर्च करावी, असे इस्लामचे तत्त्व आहे. त्या अनुषंगाने आमच्या ग्रुपतर्फेही आम्ही निधी जमा करतो. त्याद्वारे गरिबांना मोफत घरे बांधून देतो. आंबेडकरनगर येथे सध्या घरे बांधण्याचे काम सुरू असून, त्याला सर्वधर्मीयांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: society donation poor residence