Crime News : अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याने सोसायटीतील सभासदांना मारहाण

पार्किंग मधील अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत सांगितल्याचा राग आल्याने सिंहगड रस्ता परिसरातील सोसायटीतील सभासदांना मारहाण.
beating
beatingsakal
Updated on

सिंहगड रस्ता - पार्किंग मधील अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत सांगितल्याचा राग आल्याने सिंहगड रस्ता परिसरातील सोसायटीतील सभासदांना मारहाण झाली तर; सोसायटीतील महिला सदस्यांचे केस ओढून फरपटत नेले आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील रिद्धी सिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीच्या 'ए' विंग येथे ही घटना घडली. फिर्यादींनी सिंहगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रिद्धी सिद्धी रोजवूड पॅराडाईज या सोसायटीत गेल्या बारा वर्षापासून ते राहत आहेत. सध्या सोसायटीच्या सचिव पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे.

दरम्यान सोसायटीमधील एका फ्लॅट धारकाने सोसायटीतील पार्किंग मध्ये 15 ते 20 दिवसापूर्वी पत्रा लावून फॅब्रिकेशनचे काम सुरू केले होते. हा फ्लॅट पल्लवी शिवाजीराव कोकाटे यांच्या मालकीचा असून त्यांनी मल्लिका गाजरे आणि समीर पायगुडे यांना राहायला दिला आहे.

परंतु सोसायटीने सदरचे बांधकाम अनधिकृत असून फ्लॅट धारकाला बांधकाम काढून घ्यावे अशी नोटीस दिली. ही नोटीस दिल्यानंतरही बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने 13 एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास सभासदांची पार्किंग मध्येच सभा आयोजित केली होती. या सभेत हे बांधकाम काढून टाकण्यात यावे, असे ठरविण्यात आले. त्यानुसार पार्किंग मधील बांधकाम काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान मल्लिका गाजरे आणि त्यांचे मित्र समीर पायगुडे यांनी 'आम्हाला न कळवता बांधकाम का काढले आणि जसे होते तसे पुन्हा पत्राचे बांधकाम करून द्यावे असे सोसायटीला सांगितले. परंतु सोसायटीने त्यांना यापूर्वी पाठवलेली नोटीस आणि सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले.

सोबतच नियमानुसार ते काढून टाकण्याचे देखील सांगितले. यावर मल्लिका गाजरे यांनी आरडाओरड सुरू केली. उपस्थित महिलांना शिवीगाळ केली; तर समीर पायगुडे यांनी लोखंडी सळई घेऊन सोसायटीच्या सचिवांवर धावून गेले. यातच सोसायटीतील आणखीन एका सदस्याला लागले.

दरम्यान समीर पायगुडे यांनी येथील एका महिलेचे केस ओढत फरपटत नेले. त्यात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. दुसऱ्या एका महिलेच्या उजव्या हातावर रॉड मारल्याने जखम झाली, तर तिसऱ्या महिलेच्या गालावर जोरात चापट मारली. सोबतच उपस्थित सोसायटी सभासदांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिलांशी अश्लील बोलून शिवीगाळ करत अर्वाच्य भाषा वापरली.

समीर पायगुडे यांनी त्यांची चार चाकी गाडी काढताना; सोसायटीत पार्क असलेल्या दुसऱ्या एका गाडीला धक्का देऊन त्याचे देखील नुकसान केले. सोसायटीच्या सचिवांच्या घरी जाऊन त्यांच्या अकरा वर्षाच्या मुलाला धमकी दिली. याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com