

अबॅकस स्पर्धेत देशात
सोहम साबळे दुसरा
वडूज : चिखली येथील विश्वास विद्यानिकेतनचा विद्यार्थी सोहम अमर साबळे याने महाराष्ट्र राज्य अबॅकस स्पर्धेमध्ये देशपातळीवर द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. १६ देशांतील स्पर्धकांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सोहम भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमर साबळे यांचा तो चिरंजीव आहे. या निवडीबद्दल सोहमचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मार्गदर्शक शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
W20610
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.