सोपानराव कराळे

सोपानराव कराळे
Published on

जमिनीचा पोत टिकून

इन्फो
...
आगडगाव चोहोबाजूंनी डोंगराने वेढलेलं. शेतीसाठी बाहेरील पाणी योजनेची आशा नाही. डोंगर उतारावरून जाणारे पाणी अडवून झिरपणाऱ्या पाण्यावर विहिरी जिवंत राहतात. बारामाही पाणी देणाऱ्या विहिरी तुरळक आहेत. उन्हाळ्यातील तीन-चार महिने शेतीला पाणी मिळत नाही. साहजिकच खरीप व रब्बी पिके घेतली जातात.
- सोपानराव कराळे, कृषी सहायक.
...
आ गडगाव परिसरातील जमीन प्रामुख्याने काळी आणि मुरमाड (हलकी ते मध्यम स्वरूपाची) आहे. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम ते चांगली आहे. येथे खरीप व रब्बी हंगामात बाजरी, ज्वारी, आणि तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. मुरमाड जमिनीत डाळिंब किंवा सीताफळासारखी फळझाडे चांगल्या प्रकारे वाढू शकतात. शेतीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा आणि ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. याबाबत शेतकरी सजग आहेत.
शेतजमिनीचा पोत म्हणजे जमिनीत वाळू, बारीक माती आणि गाळ यांचे असलेले प्रमाण होय. जमिनीचा पोत हा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, हवा खेळती राहणे आणि पिकांची मुळे वाढणे यावर थेट परिणाम करतो. सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य मशागतीमुळे जमिनीचा पोत सुधारता येतो. गावातील जमिनीचा पोत चांगला आहे. पोटॅशचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. चुन्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्ये पुरेशी मिळतात. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक बऱ्यापैकी आढळतात. सुक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक, लोह, बोरॉन, मँगनीज, कॉपर यांची आवश्यकता असते. हे घटक पुरेशा खतांमधून मिळतात. म्हशींची संख्या जास्त असल्याने सेंद्रिय खते शेतीला मिळतात. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून आहे.
गावातील शेतकरी खरीप हंगामात घेवडा, वाटाणा, सोयाबीन, कांदा, बाजरी अशी पिके घेतात. रब्बीत गहू, ज्वारी, हरभरा घेतली जाते. कडधान्यामध्ये हुलगा, तूर, मूग, काऱ्हळे, करडी आदी पिके घेतली जातात. भुईमूग घेणारे शेतकरी आहेत, तथापि रानडुकरांमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळत आहेत. चारापिकांमध्ये मका, ऊस, गिन्नी गवत हे म्हशींसाठी घेतले जाते. डाळिंब, संत्री अशा बागाही काही शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. गावात दुग्धोत्पादनाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे चारापिके घेतली जातात. डोंगरावरील गवत कापणीसाठी आता शेतमजूर मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अनेक डोंगरावरील चारा वाया जातो.
भविष्यात या भागात शेतीत अनेक सुधारणा करण्यास वाव आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे, गॅबीन, बंधारे करण्यात आले आहेत. तलावातील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण, समतल चर खोदणे, कनाळाच्या भागात मोठे चर खोदून पाणी साठवण केल्यास आगामी काळात विहिरींना चांगले पाणी राहील. उन्हाळ्यात जमिनी नांगरल्याने तीन-चार महिने चांगल्या तापतात. त्यामुळे आवश्यक घटक टिकून राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com