

दुचाकीस्वार जखमी,
चालकाविरुद्ध गुन्हा
सोलापूर ः अनोळखी दुचाकीने समोरून दुचाकीस धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याप्रकरणी चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी आदित्य भारत पवार (रा. होनसळ, ता. उत्तर सोलापूर) हे कपडे आणण्यासाठी दुचाकीवर (एमएच १३/ डीडी ७३१०) वडिलांना घेऊन निघाले होते. मड्डी वस्ती या ठिकाणी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने हा अपघात घडला. यात त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वाराने पलायन केले.
--
कोल्ह्याने चावा घेतल्याने
शेतकरी जखमी
सोलापूर ः शेतात शेळ्या राखताना कोल्ह्याने पायास चावा घेतल्याने एकजण जखमी झाला. रविवारी (ता. १०) दुपारी चारच्या सुमारास खरातवाडी (ता. पंढरपूर येथे ही घटना घडली. पांडुरंग मारुती बंडगर (वय ६०, रा. खरातवाडी) असे जखमीचे नाव आहे. शेतकरी पांडुरंग हे आपल्या शेतात शेळ्या राखत होते. तेव्हा कोल्ह्याने अचानक त्यांच्या उजव्या पायाचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शेटफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
दमाणी नगरात घरात आढळला मृतदेह
सोलापूर ः दमाणी नगर परिसरातील सनसिटी येथे घरात सोमवारी (ता. ११) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. अमित अशोक तेलंग (वय ४९, रा. बी. विंग, सनसिटी, दमाणी नगर, सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. अमित तेलंग हे फोन घेत नसल्यामुळे नातेवाइकांनी आणि आजूबाजूच्या नागरीकांनी त्याच्या घरी जाऊन पाहिल्यावर घर आतून बंद आढळले. लागलीच नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. फौजदार चावडी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ते काहीच काम करीत नव्हते. त्यांच्या पत्नीला पुणे येथे नोकरी लागल्याने त्या मार्च महिन्यात पुण्याला गेल्या. तेव्हापासून ते एकटेच घरी राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा उत्तरीय तपासणीनंतर होणार आहे. फौजदार चावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रिक्षा उलटून चालक ठार
सोलापूर ः कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटून घडलेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. जुना तुळजापूर नाक्याजवळील कचरा डेपोसमोर हा अपघात घडला. नितीन नारायण माने (वय ३७, रा. पसारे वस्ती, जुना तुळजापूर नाका, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. तो राहत्या घरातून रिक्षा घेऊन निघाला होता. कचरा डेपोसमोर कुत्रा आडवा आल्याने त्याने जोरदार ब्रेक मारला. त्यामुळे रिक्षावरील नियंत्रण सुटून ती उलटून त्याच्या अंगावर पडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वी तो मरण पावला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
अनोळखी इसमाचा मृत्यू
सोलापूर ः देगाव नाका परिसरातील हब्बू वस्तीत रविवारी (ता. १०) पावणे तीनच्या सुमारास ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. त्याला फौजदार चावडी पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला. सिव्हिल पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.
---
विवाहितेस सासरच्या मंडळींची मारहाण
सोलापूर ः घरगुती वादातून सासरच्या मंडळींनी विवाहितेस मारहाण केली. मनीषा महादेव गणपा (वय २८, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) असे तिचे नाव आहे. हिला घरगुती कारणावरून नवरा, सासू आणि मामाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
----
घरगुती वादातून एकास पत्नी, मेव्हण्याची मारहाण
सोलापूर ः घरगुती वादातून एकास पत्नीसह मेव्हण्याने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. जावेद शाबोद्दीन शिरशाड (वय २८, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे. त्याला घरगुती वादातून पत्नी व मेव्हण्याने दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात जखमी झाल्याने त्याच्यावर अक्कलकोट येथे उपचार करून पुढील उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
-----
घरात झोपला असताना सर्पदंश
सोलापूर ः घरात झोपलेल्या तरुणास सापाने दंश केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे घडली. प्रमोद गोरख लंबे (वय २४, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) हा रविवारी (दि. 10) राहत्या घरी झोपला होता. यावेळी त्याच्या उजव्या पायास सापाने दंश केला. त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिल पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.