

PNE26W44047 -
फोटोओळ :
सोलापूर : अशोक चौकातून अक्कलकोटकडे पालखी प्रस्थानावेळी सहभागी भाविकांसह बाबर परिवारातील सदस्य.
सोलापूर-अक्कलकोट पायी पालखी पदयात्रेचे अक्कलकोटकडे प्रस्थान
८०० भाविकांचा सहभाग; उद्या वटवृक्ष देवस्थानात दर्शनानंतर सांगता
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : अशोक चौक येथून सोलापूर-अक्कलकोट पायी दिंडी पालखी पदयात्रेला शनिवारी सकाळी साडेआठ वाजता भक्तिभावात सुरुवात झाली. सुमारे ८०० महिला-पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. रविवारी (ता. २३) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानात दर्शन घेतल्यानंतर पदयात्रेची सांगता होणार आहे.
दोन दिवसांच्या पदयात्रेदरम्यान भाविकांसाठी विविध ठिकाणी प्रसाद, भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.अनिल क्षीरसागर यांच्या वतीने पालखीचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आले.
सादुल पेट्रोल पंप येथे आनंद सादुल यांच्या वतीने अल्पोपाहार देण्यात आला. कुंभारी येथे दत्तात्रय राजे व श्रीकांत उपरे मित्र परिवाराच्या वतीने भोजनप्रसाद, तर तोगरळी येथे राहुल गुत्तेदार यांच्या वतीने दूध व चिवडा वाटप करण्यात आले. रात्री विठ्ठलराव बोडडू यांच्या वतीने भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
रविवारी सकाळी सहा वाजता पालखी अक्कलकोटकडे प्रस्थान करणार आहे. विश्रांतीधाम येथे अमृतराव गायकवाड यांच्या वतीने वडापाव, तर माणिक काका यांच्या वतीने खिचडीचा अल्पोपहार देण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानात दर्शन घेतल्यानंतर भक्तनिवास येथे देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्यानंतर पदयात्रेची सांगता होऊन श्रींची पालखी सोलापूरकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती बाळप्रसाद बाबर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.