वास्तव वेध

वास्तव वेध
Published on

PNE26W43639
सोलापूर : अंत्रोळीकर नगर परिसरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम.
PNE26W43637
सोलापूर : सुशोभीकरण करण्यात येणारे गणपती बाप्पांचे मंदिर.

वास्तव वेध
प्रभाग २१
----
अंत्रोळीकर नगराच्या विकासाला आमदार कोठेंचा बुस्टर डोस
६१ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; गणपती बाप्पांच्या मंदिर परिसराचे सुशोभीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : झोपडपट्टी, फ्लॅट व प्लॉट अशा तिन्ही प्रकारच्या रहिवासी वसाहती असलेला परिसर म्हणून प्रभाग २१ची ओळख आहे. या प्रभागातील आर्थिकदृष्ट्या सक्षम परिसर म्हणून अंत्रोळीकर नगराकडे पाहिले जाते. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागातील जुन्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी ६१ लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे जवळपास १५ वर्षांपासून रखडलेल्या समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
अंत्रोळीकर नगरातील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात नुकताच या विकासकामांचा शुभारंभ झाला. विशेष निधीतून ३८ लाख ३३ हजार रुपयांत श्री गणेश मंदिरातील सभामंडपाचे काम करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे परिसरातील रहिवाशांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीही मंदिर परिसर विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे.
अंत्रोळीकर नगर परिसरात २३ लाख १७ हजार रुपयांच्या निधीतून नव्याने ड्रेनेजलाइन टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. प्रभागातील प्रमुख रस्ता असलेल्या महिला हॉस्पिटल ते आसरा चौक रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या कामादरम्यान जलवाहिनी आणि ड्रेनेजलाइनचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी नगरसेवक मनपाकडे किती व कसा पाठपुरावा करतात, यावर आगामी काळातील समस्या अवलंबून राहणार आहेत.
------------------
कोट
कोठे यांचा फोटो वापरावा
गेल्या १५ वर्षांपासून अंत्रोळीकर नगर आणि परिसराचा विकास रखडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला गेल्या दोन वर्षांत १३५ कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला. यातील तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी आतापर्यंत प्रभाग २१साठी दिला आहे.
- देवेंद्र कोठे, आमदार
------------------
कोट SLC26B29785
अंत्रोळीकर नगर परिसरातील गणपती बाप्पांच्या मंदिर परिसराचा विकास होत असल्याने रहिवाशांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. नव्याने टाकण्यात येत असलेल्या ड्रेनेजलाइनमुळेही परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी येत्या काळात काम अपेक्षित आहे.
- रोशन अहुजा, नागरिक

प्रभाग क्रमांक २१ मधील समस्यांसाठी प्रमोद बोडके (७३५०७७८३००) यांच्याशी संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com