

PNE26W58696 -
फोटोओळ :
सोलापूर : पाककला स्पर्धेतील पदार्थांचे निरीक्षण करताना शिल्पा ठोकळ, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार व अन्य मान्यवर.
मातांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
निर्मलाताई ठोकळ प्रशालेत पाककला, रांगोळी, मेहंदी स्पर्धा; २५० हून अधिक पालकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : इंदिरा ज्ञानवर्धिनी संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत आयोजित पाककला, रांगोळी आणि मेहंदी स्पर्धांमध्ये २५० हून अधिक माता-पालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धांतून महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या संचालिका शिल्पा ठोकळ अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, इनरव्हील क्लब सोलापूरच्या अध्यक्षा दीप्ती देसाई आणि सचिव जेमिनी बक्षी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेत महिलांनी उपवासाचे विविध पदार्थ तयार केले. यावेळी विद्यार्थिनींनी टिपरीवरील समूह नृत्य सादर केले. सूत्रसंचालन श्रुती मोहोळकर यांनी केले, तर वैशाली पवार यांनी आभार मानले.
----------------------
स्पर्धांचे निकाल
पाककला : प्रथम – कांचन धाये, द्वितीय – महादेवी वाघमारे, तृतीय – सुजाता राठोड.
रांगोळी : प्रथम – जयश्री धुळराव, द्वितीय – सोनाली गायकवाड, तृतीय – कशिश शिरस्वार.
मेहंदी : प्रथम – अजवा पटेल, द्वितीय – सुरैय्या शेख, तृतीय – सादिया शेख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.