कॅडरच्या हरकतींवर बुधवारी सुनावणी

कॅडरच्या हरकतींवर बुधवारी सुनावणी
Published on: 

कॅडरच्या हरकतींवर बुधवारी सुनावणी

प्रारूप मतदार यादी : शुक्रवारी सुनावणीचा निर्णय
---
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या (कॅडर) संचालक मंडळ निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर २१ हरकती आल्या आहेत. यातील नाव दुरुस्तीच्या १२ हरकती असून नाव वगळण्यासाठीच्या ९ हरकती आहेत. नऊ हरकतींवर जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्यासमोर बुधवारी (ता. २१) सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निर्णय शुक्रवारी (ता. २३) दिला जाणार आहे.
ज्या नऊ हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे, त्यामध्ये सांगोला व अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येकी चार व बार्शी तालुक्यातील एका हरकतीचा समावेश आहे. या हरकतींवर शुक्रवारी निर्णय आल्यानंतर मंगळवारी (ता. २७) अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनूसार मतदार यादी अंतिम झाल्यावर २० दिवसांच्या आत प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागतो. कॅडरसाठी १६ नोव्हेंबरच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदार यादी अंतिम झाली असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेर डिसीसीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कॅडरसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया संपविली जाण्याची शक्यता आहे. डिसीसी आणि कॅडरच्या निवडणुकीमुळे गावा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या राजकारणाला वेग आला आहे.
----
थकबाकीचा नो प्रॉब्लेम
सोसायटी मतदारसंघातून डीसीसीच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्यासाठी शंभर टक्के वसूल असलेल्या सोसायटीमधून संबंधित व्यक्तीचा ठराव असणे आवश्‍यक आहे. कॅडरसाठी मात्र हा नियम असणार नाही. कॅडरच्या संचालकासाठी कोणत्याही सोसायटीतून ठराव झालेला व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे डीसीसीमध्ये ज्येष्ठ नेते आणि कॅडरमध्ये युवा नेते किंवा निष्ठावंत कार्यकर्ते असेच सुत्र राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com