

आठ लाख हेक्टरवर
पिकांचे नुकसान
जिल्ह्यासाठी ११५० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सुमारे ९ लाख शेतकऱ्यांची ८ लाख हेक्टरवरील खरीप पिके, ऊस आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या पीक नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यांचा अंतिम अहवाल शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुमारे ११५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी (ता. २५) राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ही संयुक्त पंचनामा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर आता हा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला जात आहे. प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागले आहे. साधारण दिवाळीपूर्वी मदत मिळेल, अपेक्षा आहे.
---- चौकट ----
असे आहे नुकसान
नुकसानग्रस्त शेतकरी : सुमारे ९ लाख
एकूण नुकसान क्षेत्र : सुमारे ८ लाख हेक्टर
उसाचे नुकसान क्षेत्र : सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर
द्राक्षाचे नुकसान क्षेत्र : सुमारे १८ हजार हेक्टर
डाळिंबाचे नुकसान क्षेत्र : सुमारे ४० हजार हेक्टर
अपेक्षित मदत निधी : सुमारे ११५० कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.