पहिल्याच दिवशी २१९ अर्जांची विक्री

पहिल्याच दिवशी २१९ अर्जांची विक्री
Published on: 

लोगो : जिल्हा बॅंक निवडणूक
---
पहिल्याच दिवशी २१९
अर्जांची झाली विक्री
आमदारांसह माजी आमदारांनीही घेतले अर्ज
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. २६) उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृती सुरू झाली. पहिल्याच दिवशी तब्बल २१९ अर्जांची विक्री झाली. अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. ३०) मुदत आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात अर्जांची विक्री झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पहिल्या दिवशी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, माजी संचालक सुरेश हसापुरे, कल्याणराव काळे यांच्यासह इतरांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले. तसेच नगरसेवक जयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने, इंदुमती अलगोंड, भारत जाधव, मनीष देशमुख, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे आणि शंभुराजे जगताप यांनीही अर्ज विकत घेतले आहेत.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार काम पाहात आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमुळे कार्यालय परिसरात गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी विक्री झालेल्या अर्जांमध्ये मोहोळ, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील अर्जदारांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com